Friday, 1 August 2014

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मदिन हाच खरा मराठी भाषा दिन

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दरिद्रे असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरीबच निरक्षर पोर.!!

गावाच्या शाळेत नाव घालण्या साठी व दुसऱ्या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाउंचा शाळा व शिक्षणाचा संबंध.

तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

अण्णाभाउ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते.

अण्णाभाउंनी एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या "७७" आहे,

अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशिअन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशिया च्या राष्ट्रपती कडून त्यांचा सन्मान देखील झाला,

तमाश्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाउंनी झिडकारून व मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी,

"प्रथम मायभूच्या चरणा

छत्रपती शिवबा चरणा

स्मरोनी गातो | कवना ||"

"माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली" हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे.

संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाउंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्या दृष्टीमुळेच साकार झाला.

१६ ऑगष्ट १९४७ साली "ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे" असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

अण्णाभाउंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबऱ्यावर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले.

अण्णाभाउंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले !!

याउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच १४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले........!!

....पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाउ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला.

म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणाऱ्या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

Tuesday, 22 July 2014

अहिल्यामाई होळकर : ७/१२ ची गंमत

काय आहे 7/12 ची गंमत !

साधारणपणे भारतामध्ये घराचा (Real Estate) व्यवहार करताना 'सातबाराचा उतारा' आणावा लागतो हे बहुश्रुत आहे.
'सात बारा' हे कुठल्याही कायद्याचे क़लम नव्हे.

सातबारा हे अहिल्यामाई होळकरांनी दिलेले योगदान आहे.एकदा त्यांनी सरकारी ख़र्चाने ग़रीब माणसाच्या दारात १२ फ़ळझाड़े लावली.त्यातील सात झाड़े त्या गरीबाची आणि पाच झाड़े सरकारची.
बारा झाडांची निगा राखून,सात झाडांची म्हणजे 7/12 फळे स्वतः खावयाची आणि राहिलेली पाच झाडांची फळे म्हणजे 5/12 सरकारकडे जमा करावयाची,ती इतर गरीबांना वाटण्यासाठी.

त्यासाठी एक सरकारी दफ़्तर निर्माण करुन ह्या झाडांची नोदं करण्यात आली.
ह्या नोदींच्या उताऱ्याला 'सात-बाराचा उतारा' म्हणण्याचा प्रघात पडला तो आजतागायत चालु आहे.

( थोडंस वेगळं,हटके आणि राजकीय घडामोडी,मंत्रालयातील घडामोडी,प्रशासन निर्णय हे सर्व बातम्यांपलीकडे जाणून घेण्यासाठी वाचा
- www.mantralayalive.com निरंतर अपडेट )

Thursday, 8 May 2014

कर्मवीर भाऊराव(अण्णा) पाटील

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

रयत शिक्षण संस्था
पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.

दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -

शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री एन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली...
-विद्रोही मराठा